ग्लोबल वार्मिंगच्या युगात पर्यावरणाला अनन्य साधारण महत्व आहे त्यातच खानापूर तालुका हा जंगल संपत्ती आणि वनराईने नैसर्गिक रित्या समृद्ध आहे. खानापूर तालुक्यालाची ओळख जन संपती मुळे आहे ही संपत्ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे ती टिकवा असे आवाहन खानापूर च्या आमदार डॉ अंजलीताई निंबाळकर यांनी केले.
रविवारी सकाळी खानापूर के एल ई कॉलेज मध्ये वन खात्याच्या वतीने व्याघ्र दिन निमित्य( tiger day) आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.यावेळी कॉलेज परिसरात वृक्षा रोपण करण्यात आले.यावेळी जिल्हा वन अधिकारी एम अमरनाथ,कॉलेज चे आर व्ही हंजी उपस्थित होते.
खानापूर तालुक्यात वाघ असणे जी अभिमानाची गोष्ट आहे असे वन अधिकारी एम व्ही अमरनाथ यांनी सांगितले. यावेळी विध्यार्थ्यांना वाघ संदर्भात व्याख्यान देण्यात आले.
प्रशिक्षणार्थी आय एफ एस अधिकारी आशिष रेड्डी,खानापूर वनखात्याचे उप वन संरक्षण अधिकारी सी बी पाटील,वन क्षेत्रपाल आर एस निंगाणी,basavraj वाळेद यांच्या सह कॉलेज स्टाफ वन खात्याचे कर्मचारी मोठय संख्येने उपस्थित होते.