बेळगाव शहरात एकीकडे प्राथमिक मराठी शाळांत विद्यार्थी संख्या कमी असताना दुसरीकडे शाळा देखील अडगळीत पडल्या आहेत त्याकडे शासनाने दुर्लक्ष केलं आहे.
आळवण गल्ली शहापूर येथील 19 नंबर मराठी शाळेच्या इमारतीचा काही भाग कोसळला आहे वारंवार निवेदने देऊन सुद्धा इमारतीकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आणि त्याचा परिणाम म्हणून आज त्याचा काही भाग कोसळला रविवार शाळेला सुट्टी असल्याने नशीब बलवत्तर म्हणून विद्यार्थी नव्हते त्यामुळं कोणतीही हानी झाली नाही.
युवा समितीच्या वतीने या शाळेची दुर्दशा शासकीय अधिकाऱ्यां पर्यंत पोचवण्यात आलो होती मात्र या सरकारी शाळेच्या दुरावस्थे कडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.