दांडेली वकील संघाचे अध्यक्ष वकील अजित नायक यांच्या हत्त्येच्या विरोधात बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन करून वकिलाच्या हत्त्येचा निषेध व्यक्त करण्यात आला.
वकिलावर तलवारीने हल्ला करून भीषण हत्त्या करण्याची प्रवृत्ती समाजात जन्माला आली आहे ती नष्ट झाली पाहिजे यावर सरकारने योग्य उपाय योजना केल्या पाहिजेत अशी मागणी जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांना निवेदन देऊन करण्यात आली. बार असोसिएशन अध्यक्ष एस एस किवडसन्नावर यांच्या सह शेकडो वकिलांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.
रस्ते त्वरित दुरुस्त करा :
एकीकडे काम बंद आंदोलनात सहभागी झालेल्या वकिलांच्या एका शिष्ट मंडळाने शहरातील रस्ते दुरुस्तीचे काम त्वरित हाती घ्या अशी मागणी जिल्हाधिकाऱ्याना निवेदन देऊन केली आहे या खड्ड्यामुळे शहरात लहान मोठे अपघात होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे त्यामुळे पलीअका प्रशासन ,सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या सह सरकारी संस्थांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. वकील अण्णासाहेब घोरपडे यांच्या सह वाय के दिवटे ,रवी बोगार,सुभाष मोद्गेकर आदी वकील यावेळी उपस्थित होते.