दस का दम या कार्यक्रमात जिंकलेली रक्कम आपण बेळगाव येथील एच आय व्ही बाधितांसाठी काम करणाऱ्या अनाथाश्रमाला देणार आहे. आपले पती राज कुंदरा व आपण नेहमीच त्या आश्रमाला मदत करतो असे अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी जाहीरपणे सांगितले. पण ते नेहमी मदत करतात तो आणि आत्ताही मदत देणार असे जाहीर केलेला तो अनाथाश्रम नेमका कुठला? या प्रश्नाचे उत्तर मिळू शकले नाही. तेंव्हा शिल्पा शेट्टी यांनी ही गोळी हवेत मारल्याचा संशय निर्माण झाला आहे.
दस का दम या सलमान खान ने प्रमुख अँकरिंग केलेल्या कार्यक्रमात शिल्पा शेट्टी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी त्या कार्यक्रमात १० लाख रुपये जिंकले. या रकमेचे तुम्ही काय करणार असे सलमान खान यांनी विचारले असता आपण ही रक्कम शिल्पा शेट्टी फौंडेशन च्या वतीने बेळगाव येथील त्या अनाथाश्रमाला मदत देणार आहे आणि आपण अशी मदत त्या आश्रमाला करत आलो आहे अशी माहिती त्यांनी जाहीरपणे सांगितली होती.
या घोषणेने सगळीकडेच आनंद झाला. बेळगावच्या जनतेलाही आनंद झाला. एक मोठी अभिनेत्री आपल्या शहरातील एक आश्रमाच्या कार्याला मोठी आर्थिक मदत देणार ही बातमी सगळी माध्यमांनी प्रसिद्धही केली आणि तो आश्रम कुठला याची चर्चा सुरू झाली.
उत्सुकतेपोटी बेळगाव live ने शोध घेण्याचा प्रयत्न केला असता अशी मदत शिल्पा शेट्टी, त्यांचे पती राज किंव्हा त्यांच्या शिल्पा शेट्टी फौंडेशन अशा कुणाकडूनही कधीच बेळगावच्या संस्थेला दिली गेलेली नाही अशी माहिती मिळाली. तसेच सध्याही अशी मदत देणार असल्याचे माहितीही बेळगावच्या कुठल्याही आश्रमाला आलेली नाही.
शिल्पा शेट्टी ही मदत नेमकी कुणाला करणार याबद्दल संभ्रम आहे. अशी मदत मिळाली तर संबंधित आश्रमने त्याची माहिती जनतेला द्यावी आणि नसेल तर शिल्पा शेट्टी यांनी आपल्या जाहीर वक्तव्याचा खुलासा करावा.