शहरातील प्रत्येक रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशे नंतर महा पालिकेला टार्गेट करण्यात येत आहे त्यामुळे शहरात कोणता रस्ता कोणत्या खात्याचा आहे असे फलक लावा अशी सूचना महापौर बसाप्पा चिखलदिनी यांनी पालिका अधिकाऱ्यांना केली आहे.
शनिवारी पालिकेत समस्या निवारणार्थ प्रशासकीय बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत महापौर बोलत होते.बैठकीत पालिका आयुक्त एम शशिधर कुरेर,उपमहापौर मधुश्री पुजारी,स्थायी समितीच्या अध्यक्षा वैशाली हुलजीं,सुधा भातकांडे ,दीपक जमखंडी सह हेस्कॉम,सार्वजनिक बांधकाम खाते आणि छावणी सीमा परिषदेचे अधिकारी देखील आदी उपस्थित होते.
गेले महिनाभर होत असलेल्या संततधार वृष्टीमुळे शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे रस्त्यात खड्डेच खड्डे झाले आहेत सार्वजनिक बांधकाम खाते, छावणी सीमा परिषद आणि महा पालिकेच्या अख्तयारीत येणारे अनेक रस्ते आहेत काही हानी झाल्यास मात्र नाव केवळ पालिकेचे बदनाम होत आहे यासाठी सर्वच रस्त्यावर फलक लावा ज्यामुळे जनतेला कोणता रस्ता कोणत्या खात्याकडे आहे हे समजेल असे महापौर म्हणाले. शहरातील पडलेले खड्डे बुझवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष अनुदान मिळवा त्यासाठी पत्र लिहा अशी सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
बेकायदेशीर विना परवाना काम केलेले आढळल्यास ठेकेदार विरोधात फोजदारी गुन्हा दाखल करू असा इशारा देत पालिका आयुक्त कुरेर यांनी आगामी गणेश उत्सवाच्या अगोदर सर्व रस्त्यांचे पॅच वर्क काम पूर्ण झाले पाहिजे अश्या सूचना दिल्या. विद्युत दिवे मागील काळात उत्तर भागाला अधिक देण्यात आले होते यात नगरसेवकांनी हस्तक्षेप करताच आयुक्तांनी आगामी काळात दक्षिण मतदार संघाला देखील स्ट्रीट लाईट उत्तर भाग एवढेच देण्यात येईल असे स्पष्ट केले.