बेळगावच्या सीबीटी जवळ एक महिलेच्या बाबतीत अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. अंगावरून बस गेल्यामुळे तिचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. रुकसाना नालबंद( वय ४५) रा शिवाजी नगर, बेळगाव असे त्या महिलेचे नाव आहे.
बस तिच्या दोन्ही पायावरून गेल्यामुळे ही घटना घडली, तिला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
अती रहदारीच्या प्रश्नावर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने असे अपघात वारंवार घडत आहेत, या घटनेकडे लक्ष देऊन बसस्थानक परिसरात रहदारीला आळा घालण्याकडे प्रयत्न करण्याची मागणी वाढली आहे.
बस स्थानक परिसरास स्काय वाक प्रस्ताव आहे मात्र अजून त्याची मंजुरी किंवा काम सुरू कधी सुरू होईल याची शाशवती नाही या अपघाता मूळ स्काय वाक करा अशी मागणी जोर धरू लागली आहे