समाजाचे आपण काही देणं लागतो याची जाणीव त्यांना आहे. यामुळेच बेळगावच्या जलतरण क्षेत्रात उत्तमोत्तम खेळाडूंची एक फॅक्टरी ते झालेत, ज्यांना सरळ चालता येत नाही अशा दिव्यांगांना पोहायला शिकवून नव्हे तर जागतिक विक्रम करायला लावूनही ते स्वस्थ बसत नाहीत, विविध सामाजिक कार्यात ते आघाडी घेतात, उमेश कलघटगी असे त्या व्यक्तिमत्वाचे नाव आहे, आपली एक स्वतंत्र ओळख त्यांनी तयार केली आहे म्हणून ते बेळगावातील एक नामवंत नावाजलेले ख्याती प्राप्त कोच बनले आहेत. गुरु पौर्णिमे निमित्य या गुरूच्या कार्याचा देखील आम्ही आढावा घेतलाय.
स्वतः एक मध्यमवर्गीय घरात जन्मलेले, पेशाने सराफ असलेले मात्र वेगळी वाट निवडून त्यात एक स्थान निर्माण केलेले कलघटगी आज आपल्या कर्तबगारीच्या जीवावर मोठे झाले आहेत. ज्योतीने ज्योत पेटवा हे ब्रीद ठेऊन त्यांची कामगिरी अविरत सुरु आहे पहाटे पासून रात्री उशिरा पर्यंत ते राबत राहतात.आज गोवा वेस येथे जो महा पालिका रोटरी जलतरण तलाव दिसतो तो त्यांच्याच परिश्रमाचे फलित आहे, त्यांनी घडविलेले जलतरणपटू आज विश्वात भरारी घेत आहेत, दरवर्षी उन्हाळी सुट्टीत ते लहान मुले आणि दिव्यांगांसाठी विशेष शिबीर घेतात, केएलई संस्थेच्या आंतर राष्ट्रीय तलावाची जबाबदारीही त्यांच्याच कडे आहे.अक्वेरीयस स्विमिंग क्लब चे ते अध्यक्ष आहेत, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिअशन चे कार्यकारी सदस्य आहेत, ते स्वतः एक चांगले क्रिकेटपटू म्हणून गणले जातात.
मी शिकवलेल्या पैकी अपंगखेळाडू पैकी एकूण सात मुलांनी देशासाठी ४८ आंतरराष्ट्रीय पदक मिळवलेली आहेत. त्यात राघवेंद्र अणवेकर याच्या सारख्या घरासमोर नारळ विकणाऱ्या अपंग खेळाडूला हेरून मी आंतर राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके मिळवणार खेळाडू बनवलोय त्याला एकलव्य अवार्ड सह राष्ट्रपती पुरस्कार मिळाले आहे. एकट्या राघवेंद्र ने २८ आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत ८ वेळा देशाच प्रतिनिधित्व केलय.ज्याला शेजारीचे लोक ओळखत नव्हते त्याला शेजारची रस्ते ओळखतात तसा राघवेंद्र माझ्या हातून घडला याहून अधिक यश काय पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी गुरु पौर्णिमे निमित्य दिली.
आज २७ जुलै गुर पौर्णिमा आहे याच २७ जुलै २००८ रोजी माझ आणखी एक खेळाडू राजेश शिंदे याने आजच्या दिवशी इंग्लिश खाडी पोहून नवीन विक्रम केला होता या घटनेला आजच दहा वर्षे पूर्ण होतात हे देखील भाग्यच आहे. या शिवाय तन्वी दोद्द्न्नावर,निशांत परुळेकर, जे रोशन शी बरीच लिस्ट आहे ज्यांनी राष्ट्रीय स्विमिंग स्पर्धेत गोल्ड मिळवली आहेत. अश्या या स्विमिंग गुरूना बेळगाव live कडून गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा …
उमेश कलघटगी
जलतरण प्रशिक्षक
मोबाईल 9448187333