एका लोकप्रतिनिधीनं मनात आणलं तर खूप काही वेगळं घडू शकत. त्त्यात एका महिला आमदारानं सुरू केलेल्या वेगळ्या कामाबद्दलची ही बातमी आहे.
ही केवळ बातमी नाही तर इतरांना हे का जमलं नाही याचा विचार करायला लावणारी गोष्ट आहे….
तहसीलदार सारख्या शासकीय अधिकाऱ्यांना आपल्या घरात बोलावून उत्पन्न,जात दाखले,वृद्ध अपंग आणि विधवा पेन्शन दाखले आपल्या घरातून वितरीत करणारे आमदार बेळगावने पाहिलेत. मात्र, अधिकाऱ्यांच्या ताफ्याला घेत थेट गावात जाऊन रेशन कार्ड,वरील सर्व दाखले पुरविण्यास सुरुवात करण्याच काम करताहेत ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर …
पूर्व भागातील मुतगा निलजी बसरीकट्टी आणि शिन्दोळी गावासाठी गोकुळ नगर इथल्या दुर्गादेवी मंदिरात आक्कांनी आज जनता दरबारचं भरवला होता. वृद्ध,विधवा अपंग पेन्शन, रेशन कार्ड,जाती आणि उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी पायपीट करणाऱ्या जनतेलाच अधिकाऱ्यांच्या फौज फाट्यासह नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न केलाय.कित्येक जणांना रेशन कार्ड हवं आहे अनेक जणांना उत्पन्न आणि जातीचा दाखला हवा आहे तर अनेक वृद्ध अपंग आणि विधवा मासिक पेन्शन पासून वंचित आहेत अश्या शेकडो जणांनी जरुरी कागद पत्रांची पूर्तता करून अर्ज भरून आपल्या कामांची नोंद केली.
बेळगावचे तहसीलदार, प्रांताधिकारी ,बी डी ओ ,प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, तलाठी,ग्राम सेवक ,सर्कल, रेशन कार्ड अन्न नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी या अक्कांचा पहिल्या जनता दरबारात भाग घेतला होता.ग्रामीण मतदार संघातल्या प्रत्येक गावात हा जनता दरबार भरवून प्रत्येकाला नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.पहिल्या टप्प्यात वरील गावे झालीत उद्या बाळेकुंद्री गावात केल जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात नोंदणी केली जाणार आहे. मग जनतेला हळूहळू प्रमाणपत्रे मिळू लागतील. दुसऱ्या टप्प्यात देखील हे जनता दरबार भरवले जाणार आहेत. हळूहळू सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा उद्देश्य आहे. त्यामुळे लोकांना घर बसल्या नागरी सुविधा मिळतील “सरकारी काम आणि सहा महिने थांब” ही संकल्पना दूर करण्याचा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव live शी बोलताना दिली.
अनेक वृद्ध वंचितानी यावेळी हेब्बाळकरांचे आभार मानले.अस दृश्य कधी बेळगावात दिसत नव्हत. कारण शासकीय कामे कधीच वेळेवर होत नाहीत. बेळगावात आमदार म्हणजे जमिनी ,महिला आणि जंगल बळकावणे अशी इमेज बनली होती… अश्यात असे जनता दरबार भरवून जनतेला सुविधा देऊन हळूहळू आक्का या बेळगावच्या ‘बच्चू कडू’ बनण्याचा प्रयत्न करताहेत हे मात्र नक्की..
जनतेची फरफट वाचावी यासाठी एका आमदार महिलेनं पुढाकार घेऊन जो कामाचा धडाका लावलाय तो निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. पुरूष आमदारांना जे जमलं नाही ते करून दाखवण्याची हिम्मत असलेल्या अशा बेधडक आमदारांनी सुरू केलेल्या कामाला ग्रामीणची जनताही तितकीच साथ देईल यातसध्या तरी शंका वाटत नाही.