खड्डे आणि एपीएमसी म्हणजे समीकरण बनले आहे. मुख्य बाजार पेठ असलेल्या एपीएमसी समोर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथून ये जा करणाऱ्या नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत असून एपीएमसीला लागलेले ग्रहण कधी संपणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे हे खड्डे कधी बुजविणार आणि यावर कायमचा उपाय कधी काढणार? असेही विचारण्यात येत आहे.
गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि पंजाब, राजस्थान आदी ठिकाणाहून एपीएमसीत बाजारासाठी व्यापारी ये जा करत असतात. मात्र एपीएमसी समोरच खड्डे पडल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे बांधकाम खाते आणि एपीएमसी प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्यावर सतराशे साठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथील खड्डयांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.केवळ खड्डेच नव्हे तर ए पी दिवसा पूर्वी चार दिवस बिजली देखील गुल झाली होती मात्र प्रशासनाचे इकडे दुर्लक्षच होते.
मागील काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावर पेव्हर्स बसविण्यात आले होते. मात्र ते काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्ता पुरा खराब झाला आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून अनेकांचा जीव धोक्यात घालण्यातच प्रशासन धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे. याचा विचार करणे आवश्यक आहे. जर येथील खड्डे बुझविण्यात आले नाहीत तर आंदोलनाचा इशाराही देण्यात येत आहे.
या रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले होते. हा रस्ता करावा यासाठी आंदोलने आणि निवेदनही देण्यात आले आहे. मात्र रस्ता काही झाला नाही. हा रस्ता खराब होण्याचे मुख्य कारण म्हणजे या रस्त्यावरून सतत पाणी वाहत असते. त्यामुळे हा रस्ता वारंवार खराब होत आहे. त्यामुळे येथील एका बाजूने पाणी सोडल्यास हा रस्ता चांगला राहणार आहे. त्यामुळे हा रस्ता जर कायम सुरक्षित हवा असल्यास एपीएमसी मधून येणारे पाणी एका बाजूला काढण्यात यावे, असे मत व्यक्त होत आहे. सध्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.