जिल्ह्याचा कारभार चालणाऱ्या जिल्हा पंचायत कार्यालयासमोर ट्राफिक होताना दिसत आहे. येथे येणाऱ्या सर्व मंडळी कार्यालयासमोरच वाहने लावत आहेत. यामुळे येथे प्रवास करताना कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा पंचायत मध्ये वारंवार मिटिंग किंवा सभेचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे अनेक अधिकारी आणि जिल्हा पंचायत सदस्य येथे येतात. मात्र वाहने पार्किंग करण्यासाठी जागा नसल्याने कार्यालयासमोरच वाहने पार्किंग करत असतात. त्यामुळे दोन्ही बाजूला पार्किंग करत असल्याने रस्त्यावरच गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. ही वाहने इतरत्र पार्किंग करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जुन्या जिल्हा पंचायत समोर काही प्रमाणात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अधिक वाहने येत असल्याने येथेही जागा होत नसल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी अधिकारी यांच्याच वाहनाची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इतरत्र ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.
ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. जुन्या जिल्हा पंचायत समोरही दोन्ही बाजूने वाहने लावण्यात येत असल्याने प्रवाशांना त्रास करावा लागत आहे. त्यामुळे दोन्ही कार्यालयाच्या बाजूने लावण्यात आलेली पार्किंग यातून नागरिकांची सोय करावी अशी मागणी होत आहे. याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण होत आहे.
रहदारी पोलीस निरीक्षकांनी जसे न्यायालयीन आवारात जाऊन शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तसेच या शासकीय कार्यालय परिसरात देखील केला पाहिजेत अशी मागणी केली जात आहे.