मागील तीन दिवसापासून पाऊस कमी पडत असला तरी मार्कंडेय नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. काही दिवसापासून पावसाचा जोर होता. त्यामुळे मार्कंडेय नदी पात्र परीसरातील शेतकरी चिंतेत होते. त्यामुळे नदी परीसरातील पिके वाया जाण्याची शक्यता होती. मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने शिवारातील पाणी कमी झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत होते.
सध्या राकसकोप परिसरातील भागात मोठया प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणी सोडण्यात आले आहे, अशी मागणी माहिती मिळाली आहे. त्यामुळे मार्कंडेय नदी पात्रातील पाणी पात्राबाहेर पडले असून ते पाणी शिवारात गेले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेच्या छायेत आहेत. आणखी काही दिवस असच पाणी राहिल्यास शेतातील इतर कामे खुंटणार आहेत.
सध्या मार्कंडेय नदीवरील लहान पूल पाण्याखाली गेले आहे. दोन दिवसापूर्वी शिवारातील सारे पाणी बाहेर पडले आहे. मात्र आता नदीत पाणी वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर रोप लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे शेतातील कामे खोळंबली आहेत. बुधवार सकाळ पासून पावसाने उघडीप दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतातील पाणी बाहेर गेल्यानंतर शेती कामे वेग धरणार आहेत.