पावसाळा सुरू झाला की खेकड्यांची रेलचेल सुरू होते त्यात पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला की खेकड्यांची आवकही वाढते. सध्या बेळगावात खेकड्यांची आवक वाढली असून दरही काही प्रमाणात घटले आहेत. त्यामुळे खेकडे खवयांची चलती सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे.
मध्यंतरी मासळीची आवक मंदावली होती ती अजूनही काही प्रमाणात मंदावल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे खवय्यांची पाय आपोआपच खेकड्यांकडे वळतात. सध्या नवीन आणि ताजे खेकडे बाजारात दाखल झाले आहेत.
बेळगावात घटप्रभा, गोकाक, तसेच इतर परिसरातील खेकडे उपलब्ध होत आहेत. पावसाला सुरुवात झाली आणि नवीन खेकडे खरेफी करण्याकडे अनेकजण वळू लागले आहेत. सकाळच्या सत्रात विक्रेते विक्री करून दुपारनंतर गावी परतत आहेत.
सध्या खेकडे 20 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत जोडी असे उपलब्ध आहेत. त्यांच्या नवीन हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. फिशमार्केट,कसाई गल्ली,खासबाग आणि शहरातील विविध ठिकाणी जाऊन खेकडे विक्री सुरू आहे. आता जोराचा पाऊस झाल्यामुळे खेकडे खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे.