Thursday, January 2, 2025

/

तिलारी नदीचे विहंगम दृष्य

 belgaum

तिलारी ही बेळगाव पासून तुडिये जवळची एक महत्वाची नदी . तुडये येथील रामालिंग देवालयापासून या नदीचा उगम झालेला आहे . पूर्वेकडून ही नदी पच्छिम दिशेला वाहत जाते हे या नदीचे खास वैशिष्ट्य ! या नदीवर 1970 -75 च्या काळात तिलारी धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली व व 1980-85 दरम्यान धरणाचे काम पूर्ण करण्यात आले . या धरनात 4 टी एम सी पाणी साठा केला जातो , या पाण्यातून 60 M W वीज निर्मिती केली जाते !

वीज आणि पाणी गोवा राज्याला देण्याचा करार त्यावेळी करण्यात आला ! तिलारी ही नदी बंधाऱ्याच्या खालून वाहत जाते . धरण ओवर्फ्लोव झाले की जादा असलेले पाणी गेट द्वारे या नदीपात्रात सोडले जाते . खऱ्या अर्थाने येथूनच नदीचा प्रवास सुरू होतो. घनदाट जंगलातून ही नदी प्रवाहित होत जाते . नदीत काळ्या रंगाचे दगड ,काठावर दोन्ही बाजूनी प्रचंड मोठी विविध जातीची झाडे , झाडा -झुडपानांवर चढलेल्या हिरव्यागर्द वेली, अंतराअंतरावर असलेले लहान मोठे धबधबे , सुंदर अशा गवतफुलातून वळणे वळणे घेत जाणाऱ्या या नदीवर अंतराअंतरावर लहान -मोठे धबधबे , नदीकाठी वावरणारे वन्यप्राणी , या सर्वांमधून गर्जना करत ही नदी पुढे मार्गक्रमण करीत जाते .

River tilari

पुढे ती प्रचंड खोल दरीत उतरते आणि खरं सांगू का, तिथे तिची चित्रंच पालटते ………..!!! ” स्वप्नवेल पॉइंट ” असे नाव या ठिकानाला अलीकडे देण्यात आले आहे . निसर्गाचा एक अनमोल ठेवाच आहे हा जणू ! नजर पोहचणार नाही अशी शेकडो फूट खोल दरी , दरीचा सबंध प्रदेश हिरव्यागर्द वनराईने व्यापलेला , दरीच्या तिन्ही बाजूनी वेगाने कोसळणारे धबधबे , सतत पडणारा मुसळधार पाऊस , अत्यंत वेगाने वाहणारे वारे , क्षणाक्षणाला मोठ्या प्रमाणात दरीच्या खालच्या भागातून वरती येणारे पांढरेशुभ्र धुके , सातत्याने द्रुष्टीपथास येणारा ऊन -सावलीचा खेळ , आणि अशा वातावरणात खोल दरीतून वाहणारी नदी म्हणजे चांदीचा जिवंत प्रवाह आहे वाटते .

अतिशय सुंदर असा हा नदीचा प्रवास तिलारीमार्गे कोकणाकडे धाव घेतो . अधिक लोकसंखेच्या वस्तितून ही नदी प्रवास करत नसल्याने तिचे अस्तित्व लोकांना जाणवत नाही , पण सौंदर्याच्या बाबतीत ती किती तरी पटीने श्रेष्ठ आहे ! अलीकडच्या काळात तिलारी नदीचे सौंदर्य डोळ्यात साठ वण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येत आहेत ! नदीविषयी आपल्याला माहिती नाही असे नाही , पण मला रहावले नाही म्हणून मी थोडा प्रयत्न केला …….

माहिती संकलन -हर्षवर्धन कोळसेकर

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.