मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जलसमाधी घेऊन हुतात्म्य पत्करलेल्या काकासाहेब शिंदे यास बेळगावातील समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी शहरातील जत्ती मठात या शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या घटने नंतर महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यासाठी आगामी रविवार २९ जुलै रोजी शिनोळी नाक्यावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.मराठा आरक्षणासाठी बलिदान देऊन हुतात्मा झालेल्या काकासाहे शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र शासनाने कै काकासाहेब शिंदे यांच्या परिवारास ५० लाख रुपये नुकसान भरपाई तातडीने मंजूर करावी अशी मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समजा बद्दल काढलेल्या अपशब्दा बद्दल त्यांचा बैठकीत निषेध करण्यात आला.
रास्ता रोकोचे नियोजन करण्या संदर्भात पुन्हा शुक्रवारी बैठक घेण्यात येणार असून समाज जागृती साठी लाक्षणिक पद्धतीने काम करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रास्तविक गुणवंत पाटील यांनी केले तर यावेळी प्रकाश मरगाळे,सरिता पाटील,मदन बामणे,संजय मोरे, महेश जुवेकर ,गणेश दड्डीकर,राजू मर्वे प्रकाश शिरोळकर आदी उपस्थित होते.