देशात केवळ दोनच राज्ये हागणदारी मुक्त राज्ये म्हणून घोषणा करण्यात आली आहे आगामी २ ओक्टोंबर च्या आत कर्नाटकराज्य हागणदारी मुक्त करावे या दृष्टीने योजना आखण्यात आल्या आहेत त्यामुळे बेळगावही हागणदारी मुक्त करा अश्या सूचना ग्रामीण विकास मंत्री कृष्णा भेरेगौडा यांनी दिल्या आहेत.मंगळवारी सायंकाळी जिल्हा पंचायत कार्यालयात झालेल्या अधिकाऱ्यांच्या विकास आढावा बैठकीत अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते.
बेळगाव जिल्हा जिल्हा सर्व या योजनेसाठी रित्या पूरक आहे मात्र शौचालय निर्मितीत मागे पडल तर कसे? असा प्रश्न करून त्यांनी शौचालायची निर्मिती करून त्याचा दुसऱ्या कामासाठी वापर केला जाऊ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष ध्यावे यावर लक्ष वेधून २ आक्टोबर च्या आता हागणदारी मुक्त जिल्हा करा अश्या सूचना अधिकाऱ्यांना दिली.
व्यवस्थित नियोजन केल्यास नरेगा योजनेचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते आणि उद्योग खात्री योजनेत पैशाचा योग्य वापर करून घेऊन वेळेत काम पूर्ण होऊ शकते. नरेगा योजनेतून गोठा,अंगणवाडी बांधकाम,स्मशानची भिंत,शाळांची भिंती आणि कम्पाउंड आदींची कामे व्यवस्थित झाली पाहिजे तर ताटात जेवण ठेऊन पी डी ओ नाही कर्मचारी नाहीत अशी थातूर माथुर कारण अधिकाऱ्यांनी सांगू नयेअसेही ते म्हणाले. जिल्ह्यातील आमदारांनी या बैठकीत सहभाग घेतला होता.
रस्ते दुरुस्तीला १२२ कोटींचा निधी :
राज्यातील २४९६ पाणी शुद्धीकरण केंद्रा वेगवेगळ्या कारणांनी बंद पडलेले असून त्यांची दुरुस्ती करण्याचे कार्य राज्यभरात हाती घेतले असल्याची माहिती पंचायत राज्य ग्रामीण विकास मंत्री कृष्णाभेरे गौडा यांनी दिली. बैलहोंगल तालुक्यातील बुडरकट्टी गावासह २३ गावांना पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या २३ कोटी खर्चून बहुग्राम पाणी पुरवठा योजनेच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केल्यावर ते बोलत होते.
आताच ९५० जल शुद्धीकरण केंद्रांची दुरुस्ती पूर्ण झाली असून उरलेल्या केंद्रांची दुरुस्ती १५ दिवसात पूर्ण करा आणि जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करा असा आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल आहे असे ते म्हणाले.
पावसाने राज्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्ते दुरुस्ती करण्यासाठी आमदारांच्या माध्यमातून जिल्हा पंचायतीला १२२ कोटींचे अनुदान देण्यात आले आहे या शिवाय जिल्हा पंचायतीना शंभर कोटींचे अनुदान देण्यात आले आहे.