उमेश कत्ती यांच्या सह उत्तर कर्नाटकातील अनेक नेते आणि संघटनांनी उत्तर कर्नाटकला वेगळ्या राज्याची मागणी करत असताना राज्याचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज्यमंत्री कृष्णाभेरे गौडा यांनी उत्तर कर्नाटक वेगळं राज्य नको अशी भूमिका मांडली आहे.काँग्रेस पक्षाला आणि राज्य सरकारला अखंड कर्नाटकावर विश्वास आहे.
मंगळवारी एक दिवसीय बेळगाव दौऱ्या वर आले असता उत्तर कर्नाटकावर अन्याय होतो का या विषयावर छेडले असता त्यांनी भूमिका मांडली आहे.
उत्तर आणि दक्षिण कर्नाटक अशी भावना मुळीच नाही अन कुणाला असूही नये मात्र समस्या सोडवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायला हवे राज्याचे विभाजन होईल अशी समस्या निर्माण होऊ नये म्हणून सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे असे ते म्हणाले. अखंड कर्नाटक राहावे अशी राज्यातील जनतेची भावना आहे ही भावना कुणीही तोडण्याची भाषा करू नये काहीही समस्या असल्यास निदान करण्यावर जोर ध्यायला हवा असेही ते म्हणाले. उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत या योजना जारी होताच बेळगावचाही चेहरा मोहरा बदलेल असेही अश्वासन त्यांनी दिले.