कॉंग्रेस रोड वरील खड्डे हा सध्या बेळगावातील एक चर्चेचा विषय बनला आहे. अनेकदा निवेदन देऊन खुद महापौर उपमहापौरांनी पाहणी करून देखील खड्डे बुझवण्यास पालिका प्रशासन असमर्थ ठरल्याने मंगळवारी शिव सेनेच्या कार्यकर्त्यांनी खड्डे बुझवा आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला.
कॉंग्रेस रोड,गोवा वेस आणि एस पी एम रोड वरील खड्डे शिव सेनेच्या वतीने आंदोलन म्हणून बुझवण्यात आले. भर पावसात कॉंग्रेस रोड वर रहदारी सुरु असताना खड्डे बुजवा आंदोलन करत सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध केला आहे.
अनेकदा निवेदन देऊन देखील केवळ स्मार्ट सिटी च्या कामात हा रस्ता होणार असल्याचा आश्वासन मिळत असेल तर बेळगाव ही स्मार्ट सिटी कधीच होऊ शकत नाही असा आरोप शिव सेनचे समन्वयक प्रकाश शिरोळकर यांनी केला. या खड्डे बुझवा आंदोलना तमहेश टंकसाळी, प्रवीण तेजम,सुनील देसुरकर यांचे सह महिलाकार्यकर्त्यांनी देखील सहभाग दर्शवला होता.
बेळगाव शहरातील सर्वच रस्त्यांची अवस्था पहिली असता केवळ खड्डेच खड्डे असे चित्र आहे अश्यात अधिकाऱ्यांनी सक्षम पणा डकवणे गरजेचे आहे मात्र अधिकारी केवळ बघ्याची भूमिका बजावत आहेत त्यामुळे सगळीकडे ट्राफिक जाम आणि वाहन चालकांना त्रास होत आहे. सेनेच्या आंदोलना नंतर तरीप्रशासनाला जाग येईल का ? हाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करून राहिला आहे.