औरंगाबाद येथे नदीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या आंदोलक हुतात्म्यास बेळगावात सकल मराठा समाजाच्या अभिवादन केले जाणार आहे. यासाठी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता जत्ती मठात शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण मिळावं औरंगाबाद येथे गोदावरी नदीत जल समाधी आंदोलन आयोजित करण्यात आले होते यावेळी नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला होता यावेळी आंदोलकांना पोलिसांनी थोपवून लावलं होत मात्र गंगापूर तालुक्यातील कानड गावचा काकासाहेब पाटील शिंदे या युवकाने कायगाव टोक नदीत उडी मारून आत्महत्या केली होती हुतात्म्य पत्करले होते.
या हुतात्म्यास बेळगावातील मराठा क्रांती मोर्चा तर्फे श्रद्धांजली वाहण्यात येणार असून या निमित्ताने शोक सभेचे आयोजन करण्यात आला आहे.बेळगावातील मराठा समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठा समाजाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे आणि प्रवक्ते गुणवन्त पाटील यांनी केलं आहे.