वडगाव येथील आर्टिस्ट अजित महादेव औरवाडकर यांनी आषाढी एकादशी निमित्त विठुरायाची आणि वारकरी विश्रांती घेत असलेली रांगोळी काढली आहे.तीन फूट बाय चार फूट इतका रांगोळीचा आकार असून ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना सोळा तास लागले.
रांगोळीसाठी त्यांनी विविध रंगांच्या रांगोळीचा वापर केला आहे.वडगाव येथील ज्योती फोटो स्टुडिओ मध्ये त्यांनी रांगोळी काढली असून सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत ही रांगोळी 26 जुलै पर्यंत पाहता येणार आहे.