Friday, January 10, 2025

/

निपाणी नगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा

 belgaum

निपाणी नगरपालिकेत नगराध्यक्ष ,काही नगरसेवक आणि बांधकाम विभागातील कर्मचारी यांनी संगनमताने कोट्यावधी रुपये चा भ्रष्टाचार केला आहे .याबाबतची तक्रार आम्ही सरकारकडे केली असली तरी अद्याप त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही याबाबत सरकारने त्वरित निपक्षपातीपणे चौकशी करावी आणि संबंधितावर त्वरित कारवाई करावी” अशी मागणी निपाणी नगरपालिकेचे माजी अध्यक्ष श्भरतआन्ना कुर- बेटी यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले, गजेंद्र पोळ तसेच सामाजिक कार्यकर्ते अभय मानवी, अनिल नेस्ती ,जयराम मिरजकर, विशाल हत्तरगी व सुभाष कदम हे होते
बेळगावात आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले की, निपाणीच्या म्युनिसिपल हायस्कूल ग्राउंडवर बांधलेले कुस्तीचे मैदान बांधकामासाठी शहरातील जुन्या गटारींचे दगड वापरल्यात आले असून शेड साठी जुनी पाईप व पत्रे वापरलेले आहेत, या मैदानावर वर्षांतून एकदा कुस्त्या होतात पण त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची गरज काय असे ते म्हणाले
निपाणी नगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर भाजी मार्केट ची शेड उभा केली आहे त्यातही प्रचंड भ्रष्टाचार झालाय, गरज नसताना पंडित जवाहरलाल नेहरू जलाशयाला भिंत बांधण्यात येत आहे या जलाशयातून झिरपणारे पाणी अडविण्यासाठी दोन दोन वेळा बांधकाम केले शहरात विविध ठिकाणी केलेले गटारीचे काम निकरूस्ट दर्जाचे असून सदर काम स्वतः नगराध्यक्षांनी केले आहे त्याबरोबरच रस्त्यावरील पॅचवर्कचे काम , पवियेर ब्लॉक्सचे काम ही सगळी कामे चांगली केली नाहीत निपाणी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तळ्याभोवती तीन प्राथमिक शाळा आहेत म्हणून मुलांना होणारा धोका लक्षात घेऊन कर्नाटक शासनाकडे वारंवार मागणी करून सदर तळे बुजविण्यात आले होते त्या जागेवर नगरपालिकेने दत्त खुले नाट्यगृह बांधले आहे आणि शाळेच्या मुलांना खेळण्यासाठी खुली जागा करून दिली आहे पण विद्यमान नगराध्यक्ष आणि नगरसेवक ही पुन्हा तळे उपसण्यास लागले असून भीमा त्यासाठी साठ लाख रुपये खर्च झाला आहे नागरिकांनी विरोध करूनही त्याची दखल घेतली नाही त्याच्याखाली ड्रेनेजच्या गटारी असल्याने घाण पाणी जाऊन दुर्गंधी सुटली आहे
कर्नाटक सरकारच्या अधिसूचनेनुसार नगरपालिकेला दवाखाना किंवा शाळा चालवता येत नाहीत नगरपालिकेकडे पूर्वी ज्या दवाखाना, शाळा होत्या त्या हस्तांतरित करून देण्यात आल्या असल्या तरी निपाणी नगरपालिकेने आजही म्युनिसिपल स्कूल आपल्याकडे ठेवले आहे या शाळेवर लाखो रुपयांचा खर्च होत आहे हा सगळा अनागोंदी कारभार कधी थांबणार ?असा प्रश्न त्यांनी केला.
या सर्व भानगडी बाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली असून सरकारने त्याची त्वरित दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.