चंदगड … तिलारी मध्ये धबधब्यात बुडणा-या बेळगावच्या दोन युवतींचा जीव वाचवणा-या कुद्रेमणीच्या मनोज धामणेकरचा आज प्रातांधिकारी संगिता राजापूरकर – चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
चंदगड प्रशासकीय इमारतीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत सामिती उपसभापती विठाताई मुरकुटे होत्या.
यावेळी प्रांताधिकारी संगिता राजापूरकर यांनी दोघींचा जीव वाचवून मनोज सुपर हिरो ठरला आहे. जीव वाचवण्याच एक मौल्यवान काम करणं ही आजच्या काळात मोठी गोष्ट असून भविष्यातही तुझ्या कडून अशा चांगल्या कामाची अपेक्षा आम्ही करू अस म्हणत त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
चंदगडचे तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी जीवाची किंमत करता येत नाही. त्यामूळे मनोजच्या हातून झालेल काम उल्लेखनीय आहे. अलिकडे ह्या गोष्टी दुर्मिळ होत चालल्या आहेत. अस मत व्यक्त केल.
यावेळी मनोज धामणेकर यांने आपल मनोगत व्यक्त करून नेमकी हकिकत सांगितली.
पत्रकार विजयकुमार दळवी यांनी अशा सत्काराच आयोजन केल्याबद्दल महसूल विभाग अभिनंदास पात्र ठरला असल्याच मत व्यक्त केल.
या कार्यक्रमाला सर्कल राजगोळे, तलाठी सौ. पचंडी, भारती, विलास पाटील यासह महसूलचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
न्यूज अपडेट:अनिल तळगुळकर चंदगड