नवनवीन ‘डे’ साजरे होत असतात. यात लहानग्यानाही अशा ‘डे’च स्वप्नं न पडाव म्हणजे झालं … याच संकल्पनेतुन लहान मुलांनी अगदी रंगीबेरंगी छत्र्या संगिताच्या तालावर झुलवत बेळगाव मधील गजानन भातकांडे इंग्रजी माध्यमाच्या मुलांनी अंबरेला डे साजरा केला.
ज्युनियर केजी आणि सिनियर केजीच्या मुलांनी वर्गामध्येच मुलांनी पावसाचा आनंद लुटला. यावेळी मुलांनी आपल्या छत्र्यांवर फुगे, फुले आणि विविध रंगानी सजावट केली होती. हा ‘डे’ साजरा होत असताना इथले शिक्षकही आपल्या बालपणात हरवून गेले होते. शिक्षकांनीही संगीताच्या तालावर छत्री हातात घेत ठेका धरला होता.
या ‘डे’ मध्ये संस्थेचे संस्थापक मिलिंद भातकांडे, मुख्याध्यापिका दया शहापूरकर, के जी प्रमुख पूनम पाटील, संगिता सुतार, नफीसा मोमीन, आशा शिंदे, सरस्वती सफालिया, सुरेखा शिंदे ,अनुजा जाधव, शितल अणवेकर, स्वप्नील वाके आदीनी सहभाग घेतला होता.