बेळगाव Live ने ‘त्या’ दोघींना वाचवणा-या रियल रियल हिरोची बातमी आज प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कुद्रेमणीच्या मनोज धामणेकरचा आपल्या कार्यालयात सत्कार करून त्याची राष्ट्रपती शौर्य आणि राज्य शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याच प्रतिपादन केलय.
बेळगाव Live या बातम्यांच्या पोर्टलची दखल आत्ता शासकीय पातळीवर होऊ लागली आहे.चंदगडचे तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी सत्कार करण्याचं सांगितलं होतं त्या नंतर आज तातडीने आमदार हेब्बाळकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी संपर्क करून मनोजला आपल्या कार्यालयात येण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार मनोजने दुपारीच त्यांच्या कार्यालयात हजेरी लावली. तिथे त्याचा यथोचित सत्कार करून त्यांच्या लक्ष्मीताई फौंडेशन तर्फे रोख बक्षीस देण्यात आलं. या छोटेखाणी संभारभावेळी युवराज कदम, सी सी सी पाटिल उपस्थित होते. यावेळी आमदार हेब्बाळकर यांनी तिलारी धबधब्या मध्ये बेळगावच्या दोन मुलींना बुडताना वाचवल्या बद्दल केंद्र आणि राज्य सरकारच्या शौर्य पदकासाठी त्याची शिफारस करणार असल्याच जाहिर केलय. शिवाय १५ अॉगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ध्वजारोहणा वेळी जाहिर सत्कार करणार असल्याच सांगितलंय.
मनोज हा स्वतः अपंग असतानाही जिवाची पर्वा न करता ‘त्या’ दोन मुलींना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतो ही बाब कौतुकास्पद आहे. मनोजच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्याने शिनोळी मध्ये नोकरी पत्करली आहे. आमदार हेब्बाळकरांच्या हस्ते रियल हिरो ठरलेल्या मनोजचा झालेला सत्कार संवेदनशील राजकारणी व्यक्तीच प्रतिक ठरला आहे. त्यामुळे आमदार हेब्बाळकर यांच्या संवेदनशिलतेचीही यानिमित्तानं चर्चा ऐकायला मिळत आहे.