गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर च्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला असृनयनांनी निरोप देणाऱ्या बेळगावकरांना आता वेध लागले ते बाप्पांच्या आगमनाचे. त्यामुळे बाप्पांच्या आगमनासाठी आता केवळ 54 दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे सारेच त्यांची वाट पाहत आणि त्यांच्या तयारीची जय्यत सुरुवात करण्यासाठी गुंतल्याचे दुसून येत आहे.
मुंबई, पुणे बरोबरच बेळगावात ही गणेशोत्सव मोट्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे येथे भव्य दिव्य अशा मूर्ती बनविण्याची लगबग सध्या सुरू आहे. हसते हसते बाजारपेठेत साहित्याची आवक वाढत आहे. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात बेळगावनगरी दुमदुमून जाणार आहे.
बेळगावातीळ मूर्तिकार सध्या गोवा व इतर ठिकाणच्या मूर्ती तयार करून त्या पाठविण्यावर भर देत आहेत. त्यानंतर बेळगावातील गणेश मूर्ती सजविण्याकडे लक्ष केंद्रित करणार आहेत. जिल्हा प्रशासनाने प्लास्टर ऑफ प्यारिस च्या मूर्तीवर बंदी घातली आहे. त्यामुळे मातीच्या मूर्ती बनविण्याकडे मूर्ती चा कल वाढला आहे. त्यामुळे मूर्तिकाराणा त्या मूर्ती वाळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
सध्या बेळगावात विविध प्रकारच्या गणेश मूर्ती मूर्तिकारांनी उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. कोणत्याही गणेश भक्त नाराज होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. अवघ्या 54 दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवचि तयारी जोरदार सुरू आहे. त्यामुळे गणेश भक्त आता गणरायाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसून येत आहे.