बेळगाव मधून येणाऱ्या पर्यटकांकडून सत्तरी तालुक्यातील ठाणे-डोंगुर्ली पंचायत क्षेत्रातील सुर्ल येथे दारू पिऊन तेथील महिला व मुलांना त्रास होईल, अशा प्रकारे धिंगाणा घातला जात असल्याने सरकारने आजपासून पुढील 30 दिवसांसाठी सुर्ल गावात दारुविक्री बंदी लागू केली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी लेविन्सन मार्टिन्स यांनी त्याबाबतचा आदेश जारी केला आहे.
सुर्लमधील ग्रामस्थ व बारमालक अशा दोन्ही घटकांनी मामलेदारांना निवेदने सादर केली होती. जिल्हाधिका:यांनी त्या निवेदनांवर विचार केला. तसेच वाळपई पोलीस अधिका:यांकडून व अबकारी खात्याच्या अधिका:यांकडूनही अहवाल घेतला आणि तात्पुरता आदेश गुरुवारी सायंकाळी जारी केला. कर्नाटकपेक्षा गोव्यातील सुर्लमध्ये दारू कमी दरात मिळते. ती पिण्यासाठी पर्यटक तिथे थांबतात.
(फोटो : स्थानिक आमदार प्रताप सिंह राणे यांना सुरल ग्रामस्थांनी निवेदन दिले)
काही पर्यटक दारू पिऊन नाल्यांवर आंघोळ करतात तर काहीजण रस्त्याच्या बाजूने थांबतात. पर्यटकांच्या गर्दीमुळे स्थानिक महिला व मुलांना रस्त्यावरून नीट जाताही येत नाही. ही स्थिती कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी ठरू शकते, तसेच महिला व मुलांविरुद्ध भविष्यात गुन्हाही घडू शकतो व त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सध्या सुर्लमध्ये 30 दिवस दारुविक्री बंद ठेवावी, असा स्पष्ट आदेश जिल्हाधिका:यांनी दिला आहे.
या आदेशाचा भंग करणा:यांचा परवाना रद्द केला जाईलच, शिवाय संबंधित व्यावसायिकाविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसारही कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिका:यांनी बजावले आहे. सुर्लमध्ये पावसाळ्यात जास्त पर्यटक येतात, असेही जिल्हाधिका:यांनी आदेशात नमूद केले आहे.
अबकारी अधिका:यांनी या आदेशाची अंमलबजावणी कठोरपणे करावी व यापूर्वी सुर्लमध्ये दारुविक्रीचे परवाने कायद्याची प्रक्रिया व्यवस्थित पाळून दिले गेले होते का? याविषयी अहवाल सादर करावा, असेही अबकारी अधिका:यांना जिल्हाधिका:यांनी सांगितले आहे.