बेळगाव येथील केंद्रीय विद्यालय 2 चा आठवीचा विद्यार्थी व जलतरण खेळाडू आदित्य बिरजे यानें दिल्लीतील राष्ट्रीय स्कुल गेम मध्ये मिळवलेल्या यशा मुळे त्याची तेलंगाणा येथे होणाऱ्या एस जी एफ आय स्पर्धेसाठी झाली आहे.
केंद्रीय विद्यालय संघटनेच्या वतीने आयोजित दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेत आदित्य याने 100 आणि 200 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये सुवर्ण पदक तर रिले मध्ये 2 सिल्व्हर मेडल तर 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात रौप्यपदक मिळवल आहे.
आदित्य ने मिळवलेल्या यशामुळे त्याच सर्वत्र कौतुक होत आहे.आदित्य हा तरुण भारत चे छायाचित्रकार अमृत बिरजे यांचा चिरंजीव आहे