शंकरगौडा पाटील समाजसेवा प्रतिष्ठान च्या दहाव्या वार्षिक स्थापना दिना निमित्य २२ जुलै रोजी भाग्य नगर येथील ३४ नंबर प्राथमिक शाळा खोली लोकार्पण कार्यक्रमा सह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती शंकरगौडा पाटील समाजसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वकील एन अर लातूर यांनी दिली. बेळगावात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
समाज सेवा प्रतिष्ठानने ३४ नंबर शाळा दत्तक घेतेली असून त्याचा लोकार्पण २२ जुलै रोजी होणार आहे याच बरोबर नूतन आमदार अभय पाटीलआणि अनिल बेनके यांच्या सत्कारा सह शैक्षणिक चर्चा सत्राचे देखील आयोजन केले असल्यचे लातूर म्हणाले.
राष्ट्रीय भाजप किसान मोर्चा उपाध्यक्ष शंकर गौडा पाटील यांच्या नेतृत्वात या प्रतिष्ठानने अनेक समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेतले असून २००९ पासून अनेक गरजू विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे गरजू महिलांना स्वयंम रोजगार तर ६० हजार हून अधिक हजारो कामगारांना मजदूर कार्ड बनवून लाखोंची मदत करण्यात आली असल्याचे लातूर यांनी सांगितले. या शिवाय आश्रय आणि आंबेडकर वस्ती योजनेतून राहणाऱ्या लोकांना हक्क पत्र मिळवून दिलंय असेही ते म्हणाले.
असे असतील स्थापना दिवसाचे कार्यक्रम
२२ जुलै वार्षिक स्थापना दिन निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्यात सकाळी ८ वाजता चन्नमा गणपती मंदिरात पूजा ८: ३० वाजता स्पंदन एच आय व्ही अनाथ मुलांना फळे वितरण तर ९: ३० वाजता रामतीर्थ नगर येथील महेश फौन्डेशन मध्ये अल्पोपहार आआनी आर्थिक मदत देणार आहेत. या शिवाय ११ वाजता अनगोळ येथील शाळा खोली लोकार्पण केली जाणार आहे. पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक गुंडू मास्तमर्डी,सी टी मजगी,मल्लिकार्जुन सत्तिगेरी,मल्लिकार्जुन बहादूर,गाजू नंद्गडकर यांच्या सह संदीप खन्नुकर आदी उपस्थित होते.