मुख्यमंत्री ग्राम विकास योजने अंतर्गत बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांबरा गावात विविध विकास कामांची सुरुवात केली.गावातील रस्ते , पेव्हर्स, सिमेंट काँक्रेट, डामरीकरणं सह एकूण एक कोटींच्या विकास कामाचं भूमिपूजन करून सुरुवात केली.
सांबरा येथील मंगळवार पेठ,शुक्रवार पेठ येथील रस्ता डामरीकरणं,मारुती गल्ली आणि कलमेश्वर गल्लीत पेव्हर्स घालणे, महादेव नगर पहिला क्रॉस,गणेश नगर,समशनभूमी रस्त्याचे डामरीकरण सह गावात विविध विकास कामे केली जाणार आहेत.ग्राम विकास योजने अंतर्गत सांबरा येथे समुदाय भवन निर्माण केले जाणार असून,सोलार एल ई डी बलब वितरण सह सुसज्ज जिम निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.
लवकरच सांबारा येथे 30 बेड हॉस्पिटल उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे जागा ठरताच या हॉस्पिटल निर्माण कामास देखील सुरुवात केली जाणार असल्याचे हेब्बाळकर म्हणाल्या.
जनतेने दिलेल्या भरघोस मतांची परतफेड ग्रामीण मतदार संघाचा विकासाच्या माध्यमातून चेहरा बदलून टाकणार असेही ठाम आश्वासन त्यांनी दिलंय.या गावातील 100 वर्ष जुनी कन्नड शाळेची जुनी इमारत पाडवून नवीन बांधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई ग्राम पंचायत अध्यक्ष लक्ष्मण कोलेपगोळ,इरप्पा सुळेभावी,बसू देसाई,सदाशिव पाटील आदी उपस्थित होते.
विमानतळ रस्त्याचे काम लवकरचं
विमान तळाच्या रस्त्याची दुर्दशा झाल्याचे वृत्त बेळगाव live ने प्रसिद्ध केले होते त्या रस्त्याची सांबरा येथील शेतकऱ्यांना गरज आहे.पी एम जी एस आणि फ्लड योजने द्वारे प्रस्ताव करून शासना कडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. आगामी नोव्हेंम्बर पासून काम सुरू होईल असे आश्वासन आमदार हेब्बाळकर यांनी दिले आहे.
संमिश्र सरकार अस्तित्वात येऊन दोन महिन्याचा अवधी झाला नाही अजून बरेच आमदार मतदार संघाची ओळख करून घेताहेत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मात्र विकास कामांचा धडाकाच सुरू केला आहे.