नगर प्रशासन मंत्री रमेश जारकीहोळी हे 13 आमदारांच्या सोबत अजमेर ला गेलेत यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नाही असे वक्तव्य सतीश जारकीहोळी यांनी केलंय.
रमेश यांचेसह 13 आमदार नाराज होऊन अजमेरला गेलेत का?ते सरकार मधून बाहेर पडतील का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यांनी वरील वक्तव्य केलंय. गुरुवारी सकाळी जिल्हा पंचायत कार्यालयात बोलत होते.
रमेश जारकीहोळी यांनी केलेला अजमेर दौरा हा सहज केलेला दौरा आहे मागील कार्यकाळात अशोक पट्टण आणि मीही अजमेर दौऱ्यावर गेलोच होतो या दौऱ्याचा राजकीय अर्थ काढणे चुकीचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्षात गटबाजी नाही जसं रमेश अजमेर ला गेलेत तसेच पुढील आठवड्यात मी माझ्या समर्थकांसह सिक्कीम ला जाईन.धार्मिक यात्रेला गेलेल्यावर राजकारण करणे चुकीचे असल्याचं त्यांनी म्हटलंय.
बुधवारी रमेश जारकीहोळी यांनी 13 आमदारां सह अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांच्या दर्ग्याचं दर्शन घेतलं होतं मात्र नाराज आमदारांनी हा धार्मिक दौरा केला राजकीय प्रेरित होता अशी माहिती समोर आल्याने हा अजमेर दौरा चर्चेत आला आहे.