आपल्या वृद्धपकाळातही दुसऱ्या वृद्धांची काळजी घेणारे कमीच. मात्र सामाजिक भान आणि आपले कर्तृत्व समजून सामाजिक बांधिलकी जपणारे आजही आहेत.
गंगाधर कापशी त्यांचे नाव आहे. त्यांनी शांताई वृद्धा आश्रमला 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन समाजात एक चांगला संदेश दिला आहे. त्यांनी जीवनात मोठ्या सचोटीने अनेक समाज कार्ये केली असून पाहिला पासूनच चांगल्या कार्यात सहभाग घेतला आहे.
आपण समाजाला काही तरी देण लागतो अशी त्यांची भावना आहे. त्यांनि याआधीही अनेक संघ, संस्थाना आर्थिक मदत केली आहे. आता त्यांनी शांताई वृद्धाश्रमला आपल्या पत्नी शकुंतला यांच्या नावे ही देणगी दिली आहे.
धनादेश देताना त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंबिय ही उपस्थित होते. कार्याध्यक्ष विजय मोरे, व्यवस्थापक नागेश चौगुले यांनी त्यांचे आभार मानले.
आजकालच्या युगात पैशासाठी मारामारी होत असतेमात्र कापशी सारख्या सामाजिकतेचे भान ठेवणाऱ्या नागरिकांच्या कार्यामुळेच आमच्यासारख्या संस्था चालतात अशा देणगी देण्यासाठी त्यांचे कुटुंबियांही सहकार्य करतात. याहून मोठी गोष्ट काय असेल त्यांच्या या उदार देणगींमुळे त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच अशी भावना माजी महापौर विजय मोरे यांनी बेळगाव live व्यक्त केली आहे.
ज्यांच्याकडे पैसे असतात ते झाकून ठेवतात मात्र ज्यांना माणुसकी आहे ते मात्र सामाजिक भान ठेवतात गंगाधर कापशी यांनी या सामाजिक कार्यासाठी अनामत रक्कम ठेव ठेवली आहे. त्यातील आलेल्या रक्कमेतून त्यांनी सामाजिक भान राखण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळेच तर अजूनही माणुसकी जीवंत आहे असेही मोरे म्हणाले.