बळळारी नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मुचंडी मुतगा हा संपर्क रस्ता पाण्याखाली गेला आहे परिणामी सांबरा आणि कणबर्गी परिसरातील गावांचा या मार्गातून संपर्क तुटला आहे.पावसाचा जोर कायम असल्याने बळळारी नाला आज पात्रा बाहेर वहात आहे.
बसवण कुडची ते सुळेभावी परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे.किनाऱ्यावरील शेतीला पुराचा धोका निर्माण झाला आहे विशेष करून भात पिकाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे तर ऊस पिकाला ही काही प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या स्थितीत बळळारी नाल्याच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे परिणामी मुचंडी मुतगा संपर्क रस्त्यावर पाणी आले आहे.पाण्याच्या पात्रात केवळ पूल नजरेत पडत असून पुलाच्या दोन्ही बाजूस रस्ता पाण्याखाली गेला आहे.बुधवार सकाळ पासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे त्यामुळे या भागातील नागरिकांना बेळगाव किंवा सूळेभावीला वळसा घालून जावे लागत आहे.
मुचंडी मुतगा हे अंतर केवळ तीन की मी आहे मात्र सध्या सुमारे 20 की मी फेरा मारून जावे लागत आहे.गेल्या तीन वर्षां नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नाल्या पलीकडे शेती असणाऱ्यांना मात्र अडचण निर्माण झाली आहे.
सांबरा भागात कुडची, निलजी, शिंदोली, बसरिकट्टी,मास्तमर्डी तारिहाळ मुतगा, सांब्रा, बाळेकुंद्री तसंच कणबर्गी परसरीत कलखांब मुचंडी, चंडगड, खंणगाव आदी गावाना एकमेकाना जोडणारा हा जवळचा मार्ग आहे त्यामुळे लोकांना गैरसोय होणार आहे