शहरात गांजा विक्री करणाऱ्या चौघा कॉलेज विद्यार्थ्यांना अटक करण्यात शहर गुन्हा अन्वेषण पोलिसांनी यश मिळवलं आहे.
शहरात या गांजा विक्रीच्या धंद्यात थेट कॉलेज विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती सी सी बी पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली असून गुन्हा अन्वेषण पोलिसांनी या गांजा विक्री प्रकरणात छडा लावला आहे.
बेळगावच्या गंग वाडीत दुर्गादेवी मंदिर जवळ अशोक नगर आणि फोर्ट रोड येथील चौघांना शहर गुन्हा अन्वेषण पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सरजू गोविंद लोंढे, निखाब पिरजादे,तबरेज नरगुंद,अश्या चौघांना अटक करून त्यांच्या जवळील दीड किलो गांजा जप्त केला आहे.
गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर यांनी गुन्हा नोंद करून घेऊन पुढील तपास चालवला आहे शहर गुन्हा अन्वेषण पोलीस स्थानकात याचा गुन्हा नोंद झाला आहे.