गत विधान सभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर नगर प्रशासन आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी अजमेर दर्ग्याचा आशीर्वाद घेतला आहे.बुधवारी सकाळी राजस्थान येथील अजमेर इथल्या ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांच्या दर्ग्याला भेट देऊन चादर अर्पण केली.
आपल्या सोबतीला विधान परिषदेचे आणी विधान सभेच्या 13 आमदारांना घेऊन त्यांनी हे दर्ग्याचे दर्शन घेतलं आहे.आमदार विवेकराव पाटील, आमदार रहीम यांच्यासह काँग्रेस नेते सुनील हनमनावर,हाशम भाविकट्टी, उत्तम पाटील आणि किरण पाटील हे देखील उपस्थित होते.
संमिश्र सरकार व्यवस्थित चालुदेत अशी मागणी या दर्ग्यात करण्यात आली आहे. यावेळी रमेश जारकीहोळी यांनी अजमेर पासून जवळच असलेल्या पुष्कर येथे जाऊन ब्रह्माजीच्या मंदिराला देऊन आशीर्वाद घेतला.