कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या ऑटो नगर बेळगाव येथील मैदानास अच्छे दिन येणार असून आगामी आगष्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेट सामना खेळविला जाणार आहे. आगामी 4 आगष्ट ते 7 आगस्ट दरम्यान भारत अ विरुद्ध आफ्रिका अ टीमचा चार दिवसीय सामना खेळविला जाणार आहे याशिवाय या सामन्या अगोदर सराव सामना देखील खेळविला जाणार आहे यामुळे बेळगावातील क्रिकेट शौकिनाना आंतरराष्ट्रीय सामना पहायची पर्वणी मिळणार आहे.
या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाचे 26 जुलै रोजी बंगळुरूत आगमन होणार असून हा संघ 28 जुलै रोजीच हा संघ बेळगावात दाखल होणार आहे तर भारतीय अ संघ 1 आगष्ट रोजी बेळगावात येणार असून संघा सोबत राहुल द्रविड असणार आहेत या संघात करूण नायर,पृथ्वी शॉ,श्रेयस अय्यर,मयांक अगरवाल आणि अंकित राजपूत यांच्यासह आफ्रिका अ संघातील अनेक नामवंत खेळाडूंचा खेळ पहावयास मिळणार आहे.
आफ्रिका भारत अ संघातला चार दिवसीय क्रिकेट सामना अन त्या अगोदर सराव सामना आयोजित करण्यासाठी हे मैदान सज्ज असल्याची प्रतिक्रिया बाबा बुसद, अविनाश पोतदार आणि दीपक पवार यांनी दिलीय. मुख्य आणि सराव साठी खेळपट्टी बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून पावसात 30यार्ड मैदानाला झोपण्यासाठी अच्छादनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती बेळगाव स्पोर्ट्स क्लबने दिली आहे.
या अगोदर बेळगावात गुजरात वि तमिळनाडू, गुजरात वि पंजाब सामने झाले आहेत तर यावेळी जसप्रीत बुमराह,अक्षर पटेल,दिनेश कार्तिक, यांनी हजेरी लावली होती तर भारत बांगला महिला संघ, एन सी ए16 वर्षी खालील सराव सामने झाले होते.