मार्केट यार्ड ते कंग्राळी खुर्द रस्त्यावरील प्रचंड खड्डे पडलेले असताना रास्तारोको करूनही दुरुस्तीकडे टाळाटाळ करणाऱ्यां सार्वजनिक बांधकाम खात्याच्याअभियंत्यांना जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी धारेवर धरले त्यामुळं डागडुजीचे काम सुरू करण्यात आले.
आज या रस्त्यावर पाहणी करण्यावर डेप्युटी अभियंते एस सुरेश, बी जी धरणी, एम बी कुलकर्णी, ए इ मठपती हे सगळे आले होते. रास्तारोको करूनही काम का सुरू झाले नाही? असा प्रश्न सरस्वती पाटील यांनी विचारला असता, अमावस्या असल्याने काम सुरू झाले नाही असे उत्तर देण्यात आले यामुळे सरस्वती पाटील भडकल्या.
जनतेच्या कल्याणासाठी लवकरात लवकर हे काम पूर्ण करा अशी सूचना त्यांनी केली. अमावस्या, पौर्णिमा असली काहीतरी कारणे देऊन कामात टाळाटाळ करू नका असा इशारा त्यांनी दिला.अखेर कंत्राटदार सुनील धोत्रे यांच्याकडे दुरुस्तीचे काम देण्यात आले असून काम वेळेवर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
जि.पं. अभियंत्यांनी का घेतली धास्ती
वारंवार मागणी करूनही एपीएमसी आणि कंग्राली खुर्द येथील रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र संतप्त नागरिकांनी याबाबत आवाज उठवला आणि रस्त्यातच वृक्षारोपण केले होते त्यामुळे प्रशासनाला खडबडून जाग आली आणि कामाला सुरुवात झाली. मात्र थातुरमातुर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जि. पं. सदस्य सरस्वती पाटील यांनी त्यांना चांगलीच कानउघाडणी केली.
एपीएमसी ते कंग्राळी खुर्द येथील सुमारे 2 ते 3 किलोमीटर रस्त्याची चाळण झाली आहे त्यामुळं नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते आणि मरण यातनाही भोगाव्या लागत आहे. या रस्त्यासाठी सुमारे 5 कोटींची तरतूद करण्यात आली तरी रस्त्याचे काम केव्हा सुरू होणार असा प्रश्न निर्माण झाला. यामुळे ग्रामस्थानी
रास्ता रोकोचा इशारा देताच प्रशासनाने लागलीच या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. बुधवारी पुन्हा रास्ता रोको करण्यात येणार होता त्यामुळे मंगळवारी सकाळीच कामाला सुरुवात झाली.
या रस्त्यावरून जात असणाऱ्या जि.पं. सदस्य सरस्वती वयातील यांनी काम सुरू असल्याचे पाहून संबंधित अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरत एपीएमसी ते अलतगा कात्रीपर्यंत चालत नेऊन खरी परिस्थिती दाखविली. त्यामुळे अभियंत्यांनी पावसपर्यंत या रस्त्याची डागडुजी करू न त्यानंतर रस्ते कामाला सुरुवात केली जाईल असे म्हटले आहे. त्यामुळे त्या अभियंत्यांना जाऊ देण्यात आले. यावेळी आर आय पाटील, चेतक कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.