गेल्या आठवड्या पासून शहर परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसाने सर्व नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत त्यामुळं शहर परिसरसतील जनजीवन अस्तव्यत झाले आहे. मंगळवारी सकाळी पासून देखील पावसाने शहराला झोडपले त्यामुळं कंग्राळी मार्कंडेय नदी तसेच हलगा बेळळारी, वडगांव बेळळारी नाल्याला पूर आला असून हजारो एकर शेती जमीन पाण्याखाली अडकली आहे.बेनकनहळळी येथील नाल्याला देखील पूर आला आहे.
जुलै महिन्यात बेळगाव तालुक्यात 251 मी मी तर खानापूर तालुक्यात 425 मी मी पावसाची नोंद झाली आहे.काल सोमवारी खानापूर येथील तिओली पूल वाहून गेला होता त्यामुळं खानापूर तालुक्यातील 25 गावांचा संपर्क तुटला आहे तर या तालुक्यातील सर्वच नदी नाल्याना पूर आला आहे.
शहरातील अनेक भागात पाणी साचलं असून सगळी कडे परिसर जलमय बनला आहे.असाच पावसाचा तडाखा आणखी दोन दिवस आल्यास शहरात देखील शाळांना सुट्टी द्यावी लागेल.