मुख्य धरण ते तिलारीनगर या मार्गावर धामणे धनगर वाडा आहे , धनगरवाड्याच्या दक्षिणेस पाण्याचा कॅनल आहे , कॅनलच्या खालच्या बाजूला हा धबधबा आहे हा धबधबा इतका सुंदर असला तरी जवळच्यानाही तो माहिती नाही ! दुर्लक्षित असा हा धबधबा आहे . थेट धबधब्यावर जाणारा रस्ताही नसल्याने निसर्गप्रेमी पर्यटक तेथे पोहचू शकत नाहीत .
पाळेनाला आणि पुरमार नाला या दोन नाल्यांचे पाणी एकत्र येऊन मिळते व पुढे ते प्रचंड खोल दरीत कोसळते !याच धबधब्याला पाळेपुरमारअसे म्हणतात एक नाला पुरमार या गावाकडुन आलाय तर तर दुसरा जंगलातून आलाय !दूरवरून हे पाणी येत असल्याने पाणी खूप व गतीही तितकीच वेगवान असते ! गर्जना करत येणारे हे पाणी जवळ जवळ 200 फूट खोल दरीत कोसळते . खरे तर तिलारी परिसरातील दरीला येथुनच सुरुवात होते .
चोहुकडे हिरवीकंच वनराई , विविध जातींची प्रचंड मोठी झाडे ,झुडपे , वेली,ऐन पावसातही फुललेली झाडे , फुले , दरीच्या खालून येणारे पांढरे शुभ्र धुके ,अविश्रांतपणे कोसळणारा मुसळधार पाऊस , प्रचंड वेगाने वाहणारे वादळी वारे , त्यात गर्जना करणारा धबधब्या म्हणजे बघणारा थक्क होऊन जातो ! त्याच्यासाठी ही एक पर्वणीच म्हणायला हरकत नाही !अत्यंत विलोभनीय ,सुंदर ,आणि डोळ्यांचे पारणे फेडण्यासारखे हे दृष्य; मनाला मोहून टाकते .या धबधब्यावर जाणे थोडे अवघड आहे ! मुख्य धरण ते तिलारीनगर या मार्गावर धामणे धनगर वाडा आहे , धनगरवाड्याच्या दक्षिणेस पाण्याचा क्यानाल आहे , क्यानालच्या खालच्या बाजूला हा धबधब्या आहे ! पण तेथून जायला रस्ता नाही . माहिती असलेली व्यक्ती असेल तरच जाता येते .बेळगाव शहरापासून अंदाजे 40 की मी अंतरावर हा धबधबा असेल..
धनगर वाड्याच्या आधी 2 कि मी डावीकडे म्हणजे क्यानालकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याने आत जाऊन ,दीड किमी क्यानालच्या बाजूने प्रवास करत पुलापर्यंत जाऊन नंतर जंगलातून जावे लागते ! नवीन मानसांसाठी येथे जाणे धोक्याचे आहे ! धबधब्याचे ठिकाणही धोक्याचे आहे . कोणी गेलेच तर दुरुनच बघणे योग्य आहे ! जवळ जाता येत नाही . खाली तर जाण्याचा प्रश्नच नाही !अनेक मित्रांनी धबधबब्याचा वीडियो पाहून माहिती विचारली म्हणून एवढा खटाटोप !गेला तर अत्यंत काळजीने , स्वताला सांभाळून एवढीच नम्र विनंती !
माहिती संकलन-हर्ष वर्धन कोळसेकर तुडिये
Harish congratulations to searching new water fall, Great