खानापूर तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे.मंणतुर्ग्या जवळील हालथर नाल्याला आलेल्या पूरात तिओली गावाजवळील पुल वाहून गेला असून यामुळे तिओली आणि तिओली या दोन्ही गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. पश्चिम भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा खानापूर शहरासह इतर भागाशी संपर्क तुटला आहे.
गेल्या दोन दिवसात पावसाने नोंदीचे व्दिशतक पूर्ण केले आहे. परीणामी, मलप्रभेसह सर्वच नदी-नाल्यांना पूर आला आहे. हलथर नाल्याला आलेल्या पुरात तिओली गावाजवळील पूल वाहून गेला आहे. सकाळी खानापूरला निघालेल्या नागरीकांच्या निदर्शनास ही बाब आली. पुल वाहुन गेल्यामुळे आज शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेला जाता आले नाही. गेल्या पाच-सहा दिवसांपासून हा पुल पाण्याखाली होता. यापूर्वीदेखील दोन वेळा हा पुल वाहुन गेला होता.
मलप्रभेसह म्हादई, पांढरी नदी, मंगोत्री या नद्या आणि हालथर, कळसा, भांडूरा, कुंभार नाला, निट्टूर नाला आदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. मणतुर्गा गावाजवळील हालथर नाल्यावरील पुल गेल्या चार दिवसांपासून पाण्याखाली गेला असून यामुळे शिरोली भागातील सुमारे २० गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जनजिवन पूर्णत: विस्कळीत झाले असून दक्षतेची सुचना तालुका प्रशासनाने केली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास ओल्या दुष्काळाची शक्यता निर्माण झाली आहे.
तिओली पुलं कसा वाहून गेला पहाण्यासाठी खालील लिंक क्लिक करा पहा बेळगाव live चा व्हीडिओ
https://m.facebook.com/story.php?story_fbid=635883366769260&id=375504746140458