शहराला गेली कित्येक वर्षे पिण्याचे पाणी पुरवठा करणारे राकस्कोप जलाशय सोमवारी दि 16 रोजी तुडुंब भरलं आहे. जलाशय भरल्याने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यासाठी जलाशयाचे दोन गेट खुले करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी हा जलाशय सप्टेंबर महिन्यात भरला होता मात्र या वर्षी हजगोळी तुडिये तिलारी गेल्या आठवडा भरापासून होत असलेल्या संततधार पावसाने जुलै महिन्यातच हा जलाशय भरला आहे.जलाशय तुडुंब भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पाणी बाहेर जाण्यासाठी दोन गेट खुले करण्यात आले आहेत.
डॅम भरण्यास रविवारी सकाळी केवळ तीन फूट शिल्लक होते मात्र त्यानंतर होत असलेल्या संततधार पावसाने सोमवारी सकाळीच जलाशय भरला आहे. राकस्कोप जलाशय भरल्याने महापौर उपमहापौरांनी आनंद व्यक्त केला असून शहर वासीयांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटली आहे.गंगा पूजन देखील लवकरच होईल अशी माहीती मिळाली आहे.