तीन मजली इमारतीवरून खाली पडल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना येळ्ळूर रोड वडगांव येथे रविवारी रात्री सव्वा नऊच्या दरम्यान घडली आहे. भालचंद्र लक्ष्मण हलगेकर वय 25 रा.कारभार गल्ली वडगांव या घटनेत मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येळ्ळूर रोड वडगाव शहापूर पोलीस स्थानकाच्या जवळील एका इमारतींवर दोघे मित्र चढले होते त्यावेळी तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झाला त्या नंतर लागलीच त्याला इस्पितळाला नेण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला.पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
सदर युवक त्या इमारती मधील सहकारी पथ संस्थेत शिपाई आणि पिगमी क्लेकटरचे काम करत होता.शहापूर पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.
16 जुगाऱ्याना अटक
मंगाई नगर मागच्या बाजूच्या हॅस्कॉम कार्यालयात जुगार खेळणाऱ्या 16 जणांना शहापूर पोलिसांनी अटक केलो आहे.रविवारी रात्री निरीक्षक जावेद यांच्या पथकाने धाड टाकून ही कारवाई करत 31 हजार 300 रुपये जप्त केले आहेत.