बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणार राकस्कोप जलाशय तुडुंब भरण्यास केवळ तीन फूट शिल्लक आहे.गेल्या चार दिवसापासून तुडिये हजगोळी आणि तिलारी परिसरात झालेल्या तुफान पावसाने राकस्कोप जलाशयाची पातळी वाढली आहे.तुडये परिसरात विक्रमी पाऊस-तुडये हजगोळी परिसरात यावर्षी पावसाने मागील सर्व विक्रम मोडून काढले आहेत सुरुवातीपासून पावसाने या परिसराला अक्षरशः झोडपून काढले . मागील 20 वर्षात एकाही वर्षात पडला नाही त्याहून अधिक पाऊस यावर्षी 13जुलै पर्यंत पडला . 13 जुलैपर्यंत या परिसरात एकूण 1800 मी मी पावसाची नोंद झाली ।जून महिन्यात एकूण 890 मी मी पाऊस पडला तर 1जुलै ते 13 जुलैपर्यंत 910 मी मी पाऊस झाला आहे . या दीड महिन्यात जेवढा पाऊस पडला तेवढा पाऊस कोणत्याच वर्षी पडला नाही .
या परिसरात दरवर्षी 2000 मी मी ते 2500 मी मी पर्यंत पाऊस होत असतो पण यावर्षी मात्र पावसाने धुमाकूळ घातला आहे . 10 जुलै रोजी सर्वाधिक 151 मी मी पाऊस कोसळला . 8जुलै रोजी 118 मी मी , 12 जुलै रोजी 109 मी मी ,9जुलै रोजी 93 मी मी ,27 जून ला 88मी मी 26 जून रोजी 85 मी मी पाऊस पडला 13 जुलै पर्यंत एकूण 1800 मी मी पावसाची नोंद झाली 14 जुलै रोजीही दिवसभर जबरदस्त पाऊस पडला या दिवशीही 125 च्या आसपास पाऊस झाला आहे .
पाऊस कमी व्हावा अशी सर्वांची अपेक्षा आहे पण पाऊस दिवसेंदिवस वाढतच आहे . अतिवृष्टीचा तडाखाच या परिसराला बसलेला आहे . अतिवृष्टीमुळे सर्वच पीके धोक्यात आली आहेत . रताळी , शेंगा ,नाचना , भात ,काजू या सर्व पिकांचे मोठे नुकसान होत आहे .शेतकरी कमालीचा चिंताक्रांत झाला आहे . पीके कुजून उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे अशी माहिती तुडिये भागातील शेतकरी देताहेत.
सततच्या मुसळधार पावसाने तण अधिक वाढत आहे . लोकांना घरातून बाहेर पाडण्याची परिस्थिती नाही.हवेत प्रचंड गारवा असल्याने अरोग्यावरही परिणाम होत आहे . परिसरातील सर्व नदी -नाले भरून वाहत आहेत.तिलारी धरण भरण्याच्या मार्गावर आहे तर राकसकोप धरण भरले आहे.
न्यूज अपडेट-हर्षवर्धन कोळसेकर तुडिये