विविध कारवायांत पोलीस आता सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. नवनवीन योजना आखून कायदे पायदळी तुडविणाऱ्याचा आता खरपूस समाचार घेतला जात आहे. यापुढे आता मद्य ढोसणाऱ्यांवरही आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. बेळगाव शहर आणि परिसरात वाहतूक पोलिस आणि नागरी पोलिसांनी मद्य पिणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
शहर आणि उपनगरातील महत्वाच्या रस्त्यावर थांबुन रात्री ८ ते मध्यरात्री १२ पर्यंत ही पोलिसांनी मद्य ढोसणाऱ्यावर कारवाईचा सपाटा सुरुच ठेवला होता. यामुळे मद्य पिणारी मंडळीची चांगलीच दमछाक झाली होती. अचानक झालेल्या कारवाईमुळे अनेकांनी आड मार्गाचा अवलंब करून पलायन करण्यातच धन्यता मानली.
शहरातील व उपनगरांतील प्रमुख रस्त्यावर पोलिसांनी आपला डेरा टाकला होता. ४० ठिकाणी पोलिसांनी एकदाच ही कारवाई सुरू केली आणि ती रात्री उशिरा पर्यंत सुरुच ठेवली होती. याची धास्ती मात्र मद्यपिना चांगलीच बसल्याचे दिसून येत आहे. यापूढे आता दारू पिताना काळजिच घ्यावी लागण्याची शक्यता आहे.
अनेक तरुण दारू पिल्यानंतर हुल्लडबाजी करत असतात. आता या पुढे मद्य ढोसून नखरे करण्याऱ्यावरही पोलिसांची टांगती तलवार असणार आहे. त्यामुळे मद्य पिणाऱ्यांचा ही पोलीस यापुढे समाचार कायम घेणार असल्याचे दिसून येत आहेत.
सगळीकडे कारवाई करणारे पोलीस शांतपणे मध्यही पिऊ देत नाहीत अशीच त्रासिक प्रतिक्रिया सध्या व्यक्त होत आहे.