Sunday, December 22, 2024

/

असाही एक ‘दक्ष’ अधिकारी …

 belgaum

अधिकारी म्हटलं की, आदेश सोडणारा अस सर्वश्रृत आहे. मात्र , एखादा आयएएस अधिकारी आपण सजग नागरिक असल्याची भूमिका पार पाडतो आणि सर्वांनाच आपल्या शहराचा वेगळा विचार करायला लावतो. असाच एक अधिकारी म्हणजे बेळगावच्या जिल्हा पंचायतीचे सीईओ रामचंद्र राव.. मॉर्निंग वॉकला गेल्यावर क्लब रोडवर हायमास्टच्या दिव्यांच्या करंटच्या वायर रस्त्यावर पडलेल्या आढळल्या त्या त्यांनी स्वतः संबंधित अधिकाऱ्याला बोलावून बाजूला सारल्या आणि आपण अधिकारी नव्हे तर सजग नागरिक असल्याची कृती करून दाखवली. त्यामुळं ते,बेळगाव करांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत.

RAmchandra raoअधिकारी हे जनतेचे पालक असतात कोणतेही समाज उपयोगी काम आपल्या अखत्यारीत येवो किंवा ना येवो ते झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे अधिकारी निराळेच असतात.

शनिवारचा दिवस होता ते सकाळी व्यायाम करून आपल्या शासकीय बंगल्यावर परतत होते गाडीतूनच त्यांनी क्लब रोड वरील डिवाईडर च्या मधोमध असलेला हायमास्ट लाईट खांब्याच्या खाली करंटच्या वायर पडलेल्या बघितल्या..हवं तर ते तसंच गेले असते मात्र त्यांनी पडणारा पाऊस अन उघडया वायर पाहून गाडीतून खाली उतरले अन संबंधित अधिकाऱ्याला बोलवून घेतलं अन वायर काढायला लावल्या.

जिल्हा पंचायत सी ई ओ म्हणून आपली जबाबदारी पार पडत असताना त्यांनी एक सामाजिक जबाबदारी म्हणून करंटच्या वायर काढल्या.पावसाच्या दिवसात वायर कट असेल तर पाण्यात लगेचच करंट पास होतोय अशात भर वस्तीतल्या वायर काढून आपल्या तत्परतेची चुणूक दाखवली आहे.

बेळगावात सध्या डायरेक्ट आय; ए एस रिक्रुट अधिकाऱ्याची कसा असतोय हे सगळ्यांना दाखवून दिलंय. हायमास्टचे दिवे आणि तो प्रश्न आपल्या अखत्यारित नसतानाही त्यांनी केलेलं काम आपण या शहराचा एक नागरिक म्हणून का करू नये ..हेच या घटनेतून अधोरेखित झालय….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.