किल्ल्यातील रामकृष्ण मिशन आश्रमात रविवार दि.१५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता पूज्य स्वामी आर्यानंदजी महाराज यांच्या विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.भक्तियोगाद्वारे ईश्वराची कृपाप्राप्ती या विषयावर ते मराठीत प्रवचन देणार आहेत.अत्यंत ओघवती भाषाशैली आणि रसाळ वाणी ही त्यांच्या प्रवचनाची वैशिष्ट्ये आहेत.
स्वामी आर्यानंदजी महाराज हे रामकृष्ण मिशनमध्ये पुणे येथे १९९० मध्ये दाखल झाले.त्यानंतर १९९७ ते २००७ या कालावधीत त्यांनी गुजरातमधील पोरबंदर येथील आश्रमात सेवा बजावली.या काळात दुष्काळ,चक्रीवादळ आणि भूकंपाच्या मदतकार्यात ते सहभागी झाले होते.२००७ ते २०१७ दरम्यान त्यांनी पुणे आश्रमात सेवा केली.२०१७ पासून ते भुवनेश्वर येथील मठात सेवा बजावत आहेत.अध्यात्म ,व्यक्तिमत्व विकास आदी विविध विषयांवर ते व्याख्यान देतात.भक्तांनी प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रामकृष्ण मिशन आश्रमचे सचिव स्वामी आत्मप्राणानंद महाराज यांनी केले आहे.