शिक्षण क्षेत्रातील पावित्र आता हरवत चालले आहे. शिक्षण क्षेत्राकडे ज्या पवित्र्याच्या दृष्टीने पाहिले जात होते त्याचा आज धंदा होताना दिसत आहे. कोचिंग क्लासमध्ये विध्यर्थ्यांची पळवापळव सुरू आहे. त्यामुळे या क्लासेसची मागणी वाढत असली तरी त्यांच्या दरातही बकासुर शिरल्याचे दिसून येत आहे.
शिक्षण क्षेत्राकडे ज्या पवित्र्याने पाहिले जात होते त्याचा आज सारीपाट होताना दिसत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे शिक्षण संस्था असल्याचे दिसून येत आहे. या संस्था चालकांचे सध्या ते कुराण बनत आहे. त्यामुळे चांगले शिक्षण मिळविण्याच्या नादात आपण भ्रष्टाचार चे धनी होत आहोत. शिक्षण संस्था मध्ये नाममात्र प्रवेश घेऊन खासगी क्लासेसकडे अधिक वळत असल्याचे दिसून येत आहे. बेळगावात हा धंदा फोफावत आहे. या धंद्यात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची बाब सामोरी येत आहे.
ठिकठिकाणी नवनवीन क्लासेस सुरू करून त्याला आता स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ही स्पर्धा आता एवढी वाढली आहे की विध्यार्थ्यांना पळवून नेण्याचे प्रकार सध्या दिसून येत आहेत. भविष्यात हा व्यवसाय भयंकर रूप देण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
काही दिवसांपूर्वी नागपूर येथे एका खाजगी क्लासच्या संचालकांची २० लाख रुपये सुपारी देऊन खून करण्यात आल्याची घटना घडली. त्याचे इतरत्र भीतीची छाया पसरली आहे. बेळगावात ही ही स्पर्धा वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याची दक्षता घेण्याची गरज आज निर्माण होत असून कोणाच्या जीवावर बेतेल अशा स्पर्धा करू नये असेच बेळगाव लाईव्ह च्या माध्यमातून सांगावेसे वाटते.