Thursday, January 2, 2025

/

‘हायवेवर बस पलटली दोन ठार’

 belgaum

रात्रभर झालेल्या संततधार पावसानामुळे नियंत्रण सुटल्याने राज्य परिवहन मंडळाची बस पलटी होऊन दोघे बस चालकासह एक वृद्ध प्रवासी ठार तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महा मार्गावर बेडेकोळमठ क्रॉस जवळ शनिवारी पहाटे साडे सहा वाजण्याच्या सुमारास अपघात घडला आहे.

bus pulti

 

बस चालक अशोक दूनडी वय 50 वर्षे रा. कित्तुर तर आणखी एक 60 वर्षीय वृद्ध घटनास्थळीच ठार झालेल्यांची नावे आहेत.घटनास्थळी हिरे बागेवाडी पोलीस निरीक्षक एस सी पाटील आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रहदारी व्यवस्थित केली अन जखमींना उपचारासाठी इस्पितळात हलवले.

बागेवाडी पोलीस निरीक्षक एस सी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार बस उडुपी डेपोची असून बेळगावं कडून हुबळी कडे जात होती त्यावेळी हा अपघात झाला आहे.अपघाता वेळी बस मध्ये वाहक चालक सोडून 18 जण प्रवाशी होते.

दोनच दिवसांपूर्वी या बडेकोळमठ क्रॉस जवळ एक मालवाहू ट्रक पलटी झाली होती मिनी डोअर टेम्पो सर्व्हीस रोड वर अपघात ग्रस्त झालो होती त्यानंतर या रोडवर चा हा दुसरा अपघात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.