बेळगाव शहरात धावणाऱ्या ऑटो चालका वर पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ऑटो चालकावर विरुद्ध ऑनलाईन मोहीम उघडली असून फेसबुक व्हाटस अप्प ट्विटर च्या माध्यमातून मीटर प्रमाणे भाडे न स्वीकारणाऱ्या ऑटो विरुद्ध तक्रार करा असे आवाहन केलं आहे.
गेल्या वेळी शहरातील कुणीही ऑटो चालक मीटर वरून भाडे आकारात नसेल किंवा मीटर पेक्षा अधिक भाडे घेत असेल किंवा प्रवाश्यांना मीटर वरून भाडे आकारण्यास त्रास करत असेल तर पोलीस दुरवाणी संख्या १०० वर आणि ९४८३९३११०० या व्हाटस अप्प नंबर वर तक्रारी दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते मात्र आता पर्यंत कुणीही अशी तक्रार केलेली नाही त्यामुळे पोलीस आयुक्तांनी इथून तक्रारी करा असे आवाहन केलं आहे. बेळगाव पोलीस आयुक्तांच्या फेसबुक पेजवर वरील माहिती देण्यात आली आहे.
ऑटो चालकांनी मीटर वर भाडे आकारणी करावी यासाठी पोलीस खात्याने जन जागृती केली असून अनेक कार्यक्रमाद्वारे ऑटो चालकांचे मन परिवर्तन करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. २०१८ जानेवारी पासून आता जुलै पर्यंत मीटर वर भाडे न घेणाऱ्या मीटर न बसवलेल्या २५५३ ऑटो वर कारवाई करून ३ लाख १२ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे.