भाजप हा राष्ट्रीय पक्ष वाघ असल्या सारखा आहे मात्र जनता दल आणि कॉंग्रेसचे संमिश्र सरकार म्हणजे जनतेला भेडसावणारे सरकार आहे अशी टीका केंद्रीय कौशल्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील एम के हुबळी येथे आयोजित कित्तूर विधान सभा मतदार संघाचे नूतन भाजप आमदार महांतेश दोड्डगौडर यांच्या सत्कार कार्यक्रमात सहभागी झाल्यावर ते बोलत होते.
विकास कामांचे श्रेय मोदींना मिळते म्हणून केंद्र सरकारच्या योजना कर्नाटक राज्य सरकार जाणून बुजून जनते पर्यंत पोचवत नाही अशी मनस्थिती या सरकारची आहे असा देखील आरोप करत त्यांनी केला.
कॉंग्रेस आपल्या आमदारांना एजंटची वागणूक देतय कारण आमदार हे जनसेवक आहेत एजंट नव्हेत असे म्हणत त्यांनी संमिश्र सरकार विसर्जित झाल्यास भाजप सत्ता मिळवेल म्हणून दल कॉंग्रेस एकमेकांना चिकटून आहेत त्यामुळे देशाला भाजप हाच पर्याय आहे असा देखील टोला त्यांनी लगावला.