परिस्थिती अगदी बेताचीच.. त्यात कर्ता पुरूषच गेल्यामुळं अख्ख कुटुंब दुःखाच्या खाईत लोटलेल….घरात लहान लहान मुलं असा संसार अर्ध्यावारच टाकून त्याच तिलारी येथे अपघातात निधन झालंय….
बाळेकुंद्री येथील मोहन रेडेकर यांच्या कुटुंबाची ही व्यथा झाली होती. मात्र , दातृत्वाच्या हातांनी हे दुःख हलकं करण्याचा प्रयत्न केला आहे. बाळेकुंद्रीतील सामाजिक कार्यकर्ते शिवराज जाधव यांनी “या” कुटुंबाला एक लाख रूपयांची मदत दिली आहे. त्यामुळं रेडेकर कुटुंबाला एक आधार मिळाला आहे.
मोहन यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यापैकी मुलगा पाचवीत तर मुलगी दोन वर्षाची आहे.
मयत मोहन हा बेळगावातील भक्ती महिला सोसायटीत काम करत होता घर चालण्या पुरता त्याला महिन्याला पगार मिळत होता अश्यात त्याच निधन झाल्याने त्याच्या कुटुंबियाची मुलांच्या शिक्षणाच काय होईल याची काळजी त्याच्या परिवाराला लागली होती अश्यात जाधव कुटुंबीया कडून मिळालेला मदतीचा हात नक्कीच मोलाचा आहे.
मागील रविवारी (८ जुलै ) रोजी तिलारी घाटात झालेल्या अपघातात बेळगाव मधीला पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता.बोकनुर येथील यल्लाप्पा पाटील शिवाजी नगर येथील पंकज किल्लेकर अष्टे येथील नागेंद्र गावडे आणि जुने बेळगाव येथील किशन गावडे यांचा देखील मृत्यु झाला होता.
मयत यल्लाप्पा पाटील हे देखील घरचे करते पुरुषच होते. कोणत्याही दुःखद घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न होणं गरजेच असत. हेच काम शिवराज जाधव आणि कुटुंबियान केलय. रेडेकर यांच्या मुलांचं शिक्षण पूर्ण व्हाव हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मदत केल्याच शशीकला जाधव आणि शिवराज जाधव यांनी बेळगाव live शी बोलताना सांगितले आहे.