बापट गल्लीतील कालिका दैवज्ञ सौहार्द संस्थेत ग्राहकांनी ठेवलेले चार किलो सोन्याचे दागिने चोरून मणिपुरम ,मुथूट फायनान्स या कंपन्यातून ठेऊन त्यावर लाखो रुपयांचे कर्ज मौज मजा करणाऱ्या तिघांना खडे बाजार पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळील अंदाजे एक कोटींचे चार किलो सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
मंगेश शिरोडकर वय ४५ रा. शास्त्री नगर,श्रीशैल तारीहाळ वय ३५ रा. मराठा गल्ली मारिहाळ,आणि मारुती रायकर वय ४५ नार्वेकर गल्ली शहापूर अशी सोसायटीच्या पैश्यातून लाखोंची मौज मजा केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार बापट गल्लीतील कालिका दैवज्ञ सौहार्द संस्थेचे मनेजर मंगेश शिरोडकर आणि आणखी दोघा सहकाऱ्यांनी सोसायटीत ग्राहकांनी ठेवी करून ठेवलेले सोन्याचे दागिने दुसऱ्या बँकेत ठेऊन फसवणूक केली आहे असा आरोप करत सोसायटीच्या चेअरमननी खडे बाजार पोलिसांत फिर्याद दाखल केली होती त्यानुसार खडे बाजार पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक करून त्यांच्या कडून चार किलो सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.